कोयना दूध संघ सर्वसामान्यांसाठी व्यापक काम करणार : उंडाळकर

कराड : सहकारातून सर्वसामान्यांची आर्थिक प्रगती व्हावी, या उद्देशाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी व सहकारी दुग्ध व्यवसाय सारखे अनेक उद्योग सुरू केले. मात्र सहकार पंढरी असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय मोडीत काढले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांनी खाजगी साखर कारखाने, खाजगी दूध संस्था काढल्या. मात्र सर्वसामान्यांना न्याय देत जनसेवा म्हणून दुग्धव्यवसाय करणाऱ्या कोयना दूध संघाने सर्वसामान्य जनतेसाठी व्यापक काम करण्याचा निग्रह केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सहकारमंत्री विलासराव पाटील - उंडाळकर यांनी केले. खोडशी, ता. कराड येथील कोयना दूध संघास खटाव तालुक्यातील विविध पदाधिकारी व प्रगतशील शेतकरी यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे, व्हाईस चेअरमन बाबुराव धोकटे, कराड खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात, प्रा. धनाजी काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजीराव घाडगे, माजी उपसभापती पोपटराव बिल्ले, सरपंच शिवाजी शेडगे, माजी उपसभापती लहकुमार मदने, पृथ्वीराज गोडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उंडाळकर पुढे म्हणाले, खाजगी व्यवसायिक दुधात प्रचंड भेसळ करून मोठे होतात आणि सर्वसामान्यांची लुबाडणूक करतात. त्यामुळे सहकार्याशिवाय पर्याय राहिला नाही हे ओळखून कोयना सहकारी दूध संघाबरोबरच खरेदी- विक्री संघ, बाजार समिती अशा अनेक संस्था सहकाराच्या आदींची प्रमुख उपस्थिती होती. माध्यमातून चालवून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका आपण घेतली आहे. या सहकारी संस्थांचा आदर्श घेऊन वाटचाल केली तर दुग्ध व्यवसायासह अनेक संस्था किफायतशीर होण्यास मदत होईल. तसेच कोयना दूध संघामार्फत सर्वतोपरी सहकार्य करू असा विश्वास त्यांनी यांनी व्यक्त केला. संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेत संघातील विविध मशिनरी व मुक्त गोठा याबाबत सविस्तर माहिती दिली. पृथ्वीराज गोडसे म्हणाले, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या भेटीदरम्यान अनेक समस्यांचा उलगडा झाला. त्यांच्या भेटीमुळे नवीन काम करण्याची ऊर्जा निर्माण होते. आणि प्रत्येक भेटीत नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळते. काका नेहमीच आम्हाला बहुमोल मार्गदर्शक ठरतात. संघाचे व्हाईस चेअरमन बाबुराव धोकटे यांनी स्वागत केले. यावेळी खटाव तालुक्यातील पदाधिकारी व शेतकऱ्यांनी मुक्त गोठा पद्धत व संघाच्या कामकाजाबाबत माहिती घेतली. कार्यक्रमास अमित जगताप, अतुल फडतरे, राजूभाई मुलाणी, विकास साबळे, राजेंद्र घाटगे, अंकुश शेडगे राजेंद्र शेडगे, राजेंद्र शेलार, कोयना दूध संघाचे दुग्धालय व्यवस्थापक श्रीकांत हणबर, नानासाहेब पवार, तानाजीराव पाटील, सुभाष माने, डॉ. विजय नष्टे, डॉ. अजय पाटील, डॉ. जयवंत फल्ले, अजित शिंदे आदींसह संघाचे संचालक, पदाधिकारी, खटाव तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.