भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीदर्शनासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दानवेंच्या विरोधात पैठणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ १७ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी 'लक्ष्मीदर्शनासंबंधी वक्तव्य केले होते. निवडणुकीच्या एक दिवस आधी लक्ष्मी दर्शन होत असते आणि अशी लक्ष्मी जर घरी चालून आली, तर तिला परत करू नका, उलट तिचे स्वागत करा,' असे वक्तव्य दानवे यांनी केले होते.
रावसाहेब दानवेंविरोधात गुन्हा दाखल
• katraj parisar