लाक्डाउन माधिल रक्तदानचा एक अनुभव

मी आज दि 25/03/2020 रोजी मेडिकेअर हॉस्पिटल,पुसद येथे रक्तदान केले.
राज्यात केवळ 10 ते 15 दिवस पुरेल एव्हढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.त्यातूनही दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवतो कारण सहसा या दिवसांमध्ये रक्तदाता रक्तदान करत नाहीत असा पूर्वानुभव आहे आणि यावर्षी तर त्यात भरीस भर म्हणून कोरोनाच्या भितीमुळे रक्तदाता रक्तदान करण्यासाठी धजावत नाहीत आणि याचा परिणाम म्हणून येणाऱ्या काळात राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवू शकतो.असे झाल्यास कोरोनामुळे कमी परंतु रक्त मिळत नसल्यामुळे अधिक प्रमाणात रुग्ण दगावण्याची श्यक्यता आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी माझी सर्व रक्तदात्याना नम्र विनंती आहे की आपण अजिबात घाबरू नये व रक्तदानसाठी पुढे यावे.रक्तदान केल्यामुळे कोरोना किंवा ईतर कुठल्याही आजाराचा धोका वाढत नाही.रक्तदत्यांनी रक्तदानसाठी जातांना व रक्तपेढी मध्ये रक्तदान करतांना मास्क वापरावेत व स्वछतेचे सर्व नियम पळून सुरक्षित रक्तदान करावे.
धन्यवाद...
डॉ गंगाधर घुटे


Popular posts
स्वातंत्र्य सैनिक भाई गंगाराम गुजर महाराज पुतळ्याजवळुन प्रारंभ प्रदान करण्यात येईल. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या साड्यांपासून पालिकेने बनवल्या अडीच हजार पिशव्या
कराडला विजय दिवसनिमीत्त भरगच्च कार्यक्रम
मित्रांनो शेतकऱ्याने शेतीच्या मालाचा भाव वाढवायला पाहिजे का आता काय मत आहे तुमचे,नाहीतर मार्केट मध्ये विकायला घेऊन जाऊ नका मस्त पैकी स्वतःच घरी बसून खावा एक वर्ष जरी देश लॉक डाऊन झाला तरी शेतकरी उपासी मारणार नाही
मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार४ अटकेत.